VIDEO : मराठा आरक्षणप्रकरणी श्वेतपत्रिका काढा, चंद्रकांत पाटलांचा सरकारला सल्ला
मुंबई - महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल. दुसऱ्या दिवशी भाजप नेते वाढीव वीज बिल, मराठा आरक्षण व शेतकरी मुद्द्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, की राज्यपालाच्या अभिभाषणात मराठा आरक्षणाचा उल्लेख नाही. त्यामुळे मराठा आरक्षणासंदर्भात श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली.