कोरोना लसीसंदर्भात कुठलीही शंका नाही - डॉ. मोहन जोशी - डॉ. मोहन जोशी लेटेस्ट न्यूज
कोरोना लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली असून मुंबईत नऊ ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र उभारण्यात आलेले आहेत. मुंबईतील महत्त्वाचे रुग्णालय म्हणून लोकमान्य टिळक म्हणजे सायन रुग्णालयात कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी हे सर्वप्रथम स्वतःला कोरोना लस टोचून घेणार आहेत. या लसी संदर्भात मला कुठलीही शंका नसून ही पूर्णपणे सुरक्षित लस आहे. त्यामुळे जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी ही लस टोचून घ्यावी, असे आव्हाहन जोशी यांनी केले आहे.