दैनंदिन जीवनात विज्ञानाला सर्वाधिक महत्व द्या, डॉ.जयंत नारळीकर यांचे आवाहन - science
मुंबई - ब्राह्मण सेवा मंडळकडून शनिवारी दादर येथे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ व गणिती तज्ज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांना 'ब्रह्मभूषण पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. नारळीकर म्हणाले, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येकाने विज्ञानाला सर्वाधिक महत्व द्यावे, जेणेकरून पुढील काळात आपल्याकडे त्याचा दृष्टिकोन अधिक विकसित होईल. तसेच लोकांनी अंधश्रद्धा घालवून विज्ञानाचा पुरस्कार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.