VIDEO : पद्मश्री पुरस्कार म्हणजे माझ्या ४० वर्षातील केलेल्या कामाचे फळ - डॉ. हिम्मतराव बावस्कर - ४० वर्षातील केलेल्या कामाचे फळ बावस्कर
रायगड - जिल्ह्यातील महाड शहर येथील प्रसिद्ध विंचूदंशावरील उपचार पध्दतीचे जनक डॉ. हिम्मतराव सालुवा बावस्कर यांना सन २०२२ साठीचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वृत्त महाडमध्ये येताच संपूर्ण महाड शहरात आनंदोत्सव साजरा करण्यात आले आहे. डॉ. बावसकर हे महाड तालुक्यातील बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असताना ते विंचू दंशावरील संशोधनाकडे वळले. दरम्यान यावर प्रतिक्रिया देतांना मला मिळालेला पद्मश्री हा पुरस्कार म्हणजे माझ्या ४० वर्षातील केलेल्या कामाचे व मेहनतीचे कष्टाचे फळ आहे. माझ्या संशोधन कार्याला मिळालेली राजमान्यता आहे. या पुरस्कारामुळे पुढील संशोधन कार्यास मला प्रेरणा मिळाली आहे, असे डॉ. हिम्मतराव बावस्कर यांनी सांगितले.