विदर्भातील संत्रा पिकाला गळती : 30 लाखाची संत्रा बाग 4 लाख रुपयातही कोणी घेईना... - damage oranges
अमरावती - विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून नावारूपास आलेल्या वरूड-मोर्शी येथील संत्रा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. परंतु दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा अंबिया बहाराला गळती आल्याने संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. संत्र्याची मोठ्या प्रमाणावर गळ होत आहे. त्यामुळे चांदुरबाजार तालुक्यातील संत्रा बागाची माजी कृषी मंत्री व भाजपा नेते अनिल बोंडे यांनी पाहणी करत संत्राला प्रति हेक्टर १ लाख रुपये हेक्टर नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. तर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दखल घ्यावी, अशीही मागणी त्यांनी केली.