महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

याद राखा ! धार्मिक तेढ निर्माण करणारे मेसेज, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केली तर जेलमध्ये जाल... - videos that promote religious fanatics

By

Published : Apr 4, 2020, 8:42 PM IST

सातारा : धार्मिक तेढ निर्माण करणारी माहिती किंवा पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित केल्यास अथवा पुढे पाठवल्या तर कठोर कारवाई करत, गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच वेळेप्रसंगी अटकही करण्यात येईल, असा इशारा सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे. देशात, राज्यात कोरोनामुळे परिस्थिती युद्धजनक बनली आहे. त्यातच धार्मिक भावना दुखावणे, समाजात तेढ निर्माण करणारी माहिती सोशल मीडियावर प्रसारित केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यामुळेच पोलीस अधीक्षकांनी असे संदेश अथवा व्हिडिओ पाठवल्यास कडक कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details