Accident Video : सावधान! पतंगामागे धावणे बेतू शकते जीवावर, अपघाताचा व्हिडिओ होतोय व्हायरल - पतंगामागे धावताना झालेले अपघात
औरंगाबाद - सध्या मकर संक्रांतीचा उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यात पतंगबाज शॉकिन आपला छंद जोपासताना दिसतात. हे करत असताना कटलेली पतंग पकडण्यासाठी अनेक जण रस्त्यावर धावताना दिसतात. मात्र पतंगामागे धावून जीवावर बेतू शकतं, याचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये एक युवक महामार्गावर कटलेला पतंग पकडण्यासाठी धावतो. त्यात मागून येणारी भरधाव कारची जोरदार धडक त्याला बसते, तो जवळपास पंधरा ते वीस फूट लांब फेकला जातो. गाडी नियंत्रण करणे अवघड जात असताना तो पुन्हा त्याच गाडी खाली येतो. हा व्हिडीओ कुठला आहे, तो कधीचा आहे. याबाबत अद्याप माहिती मिळाली नसली, तरी नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी हा व्हिडिओ प्रसारित करत आहोत.
Last Updated : Jan 14, 2022, 6:47 PM IST