EXCLUSIVE : राधानगरीमध्ये भटक्या कुत्र्याच्या झुंडीत अडकले 'सांबर'; पाहा, पुढे काय झाले - राधानगरीमध्ये भटक्या कुत्र्याच्या झुंडीत अडकले 'सांबर'
कोल्हापूर - जंगल आणि जंगलातील प्राण्यांना नेहमी जगण्यासाठी धावावे लागते. शाकाहारी प्राण्यांना आपला जीव वाचवण्यासाठी आणि मांसाहारी प्राण्यांना आपली भूक शमवण्यासाठी. मात्र कोल्हापुरातल्या दाजीपूर भागात कधी कधी हा संघर्ष जंगली प्राणी आणि गावातील भटक्या कुत्र्यांमध्ये पाहावयास मिळतो. राधानगरी येथील बायसन नेचर क्लबचे सम्राट केरकर यांनी असाच एक दुर्मिळ प्रसंग आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद केला आहे. यामध्ये जंगलाशेजारी असलेल्या राधानगरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जंगलातील ३-४ सांबर पाणी पिण्यासाठी आले होते. यावेळी गावठी कुत्र्यांना नजरेस पडली. त्यावेळी कुत्र्यांनी सांबरच्या कळपावर हल्ला केला. काही क्षण सांबर आणि कुत्रे एकमेकांच्या पाठीमागे धावताना दिसले. मात्र, शेवटी सांबर कुत्र्यांच्या झुंडीतून जंगलाकडे पळून जाण्यात यशस्वी झाले.