जागतिक मानसिक आरोग्यदिन विशेष : मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका; तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्या - डॉ. शाल्मली रानमाळे-काकडे - dr shalmali ranmole kakde kolhapur
कोल्हापूर - आज जागतिक मानसिक आरोग्य दिन आहे. सध्याच्या युगात अनेकजण मानसिक आरोग्याच्या समस्येतुन जात आहेत. यातील अनेकांना मानसोपचाराची गरज असते. त्यामुळेच लोकांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार घ्यावेत आणि या समस्येकडे कोणीही दुर्लक्ष करू नये तसेच मानसिक आरोग्याचे महत्त्व समजावे. म्हणून जनजागृतीसाठी हा दिवस साजरा केला जातो. यासंदर्भातच मानसिक आरोग्याच्या समस्या कशा उद्भवतात?, त्याची लक्षणे काय असतात?, याकडे कशा पद्धतीने उपचार घ्यावेत ?, याबाबत ईटीव्ही भारतने मानसोपचारतज्ज्ञ डॉ. शाल्मली रानमाळे-काकडे यांच्याशी संवाद साधला. पाहा, त्या काय म्हणाल्या?