कार्तिकी वारी दरम्यान संचारबंदी करु नका, आमदार परिचारक यांची सरकारला विनंती - etv bharat live
सोलापूर (पंढरपूर) - विठुरायाची कार्तिकी वारी दरम्यान संचारबंदी न करता ती पूर्णपणे भरू द्यावी. तसेच, ज्या वारकरी भाविकांचे लसीकरण झाले आहे. त्यांना पंढरपुरात प्रवेश दिला जावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रशांत परिचारक व आमदार समाधान आवताडे यांनी प्रशासनाकडे केली आहे. दोन वर्षापासून पांडुरंगाची कोणतीही वारी करोना महामारीमुळे भरू शकली नाही. त्यामुळे पंढरपुरातील व्यापाऱ्यांची आर्थिक घडी गेल्या दोन वर्षांपासून बिघडलेली आहे. दरम्यान, येणाऱ्या कार्तिकी वारीमध्ये वारकऱ्यांना लसीकरणाचे दोन डोस पूर्ण असलेल्यांना प्रवेश दिला जावा. वारी काळात कोणत्याही प्रकारचे निर्बंध पंढरपुरात लागू करू नयेत. अशी मागणी आमदार परिचारक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे.