युवा सेनेचे अनोखे आंदोलन; चक्क महावितरण अधिकाऱ्याच्या टेबलवर सोडला साप - snake release officer table Nandgaon Khandeshwar
अमरावती - जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर येथील वीज वितरण कार्यालयात युवा सेनेकडून अनोखे आंदोलन करण्यात आले. लोडशेडिंग प्रकरणी युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी चक्क महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून अवेळी विद्युत बंद होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास होत आहे. तालुक्यात कुठेही लोडशेडिंगची सूचना महावितरणकडून देण्यात आली नाही, तरीदेखील विजेचा लपंडाव होत असल्याने आज युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश मारोटकर यांनी चक्क महावितरण कार्यालय गाठून अधिकाऱ्यांच्या टेबलवर साप सोडला व याबाबत जाब विचारला. टेबलवर साप सोडताच अधिकाऱ्यांना थरकाप सुटल्याचे यावेळी दिसून आले. सद्या या अनोख्या आंदोलनाची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.