आयएनएस विराटचे तोडकाम सुरू, संग्रहालय बनविण्याची आशा मावळतीला - आयएनएस विराटचे संग्रहालय
भारतीय नौदलातून निवृत्त झाल्यानंतर आएनएस विराट विमानवाहू नौकेचे रुपांतर संग्रहालयात करण्याचे नियोजित होते. मात्र, आता या जहाजाचे तोडकाम सुरू असून संग्रहालय बनविण्याच्या आशा मावळतीला गेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने या जहाजाचे संग्रहालयात रुपांतर करण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, आता हे जहाज तोडण्यास सुरुवात झाल्याने पुन्हा त्याचे भाग जोडणे अशक्य दिसत आहे.