औरंगाबादमध्ये कुलस्वामिनी प्रतिष्ठाणचा 1001 दिवे लावून दीपोत्सव साजरा - Kulswamini Pratishthan in Aurangabad
औरंगाबाद - दिवाळीच्या निमित्ताने कुलस्वामिनी प्रतिष्ठानने 1001 दिवे लावून दीपोत्सव साजरा केला आहे. दिवाळी हा खरंतर दिव्यांचा सण, दिव्याच्या प्रकाशाने सर्व जग प्रकाशमान व्हाव जगातील अपप्रवृत्ती नष्ट व्हाव्यात आणि समाजाला नवी दिशा मिळावी, जग प्रकाशमान व्हावं यासाठी लक्ष्मीच्या 12 फुटी प्रतिमेसमोर शंभर महिलांनी पारंपरिक वेशभूषा करत हा दीपोत्सव केला आहे. याबाबत अधिकची माहिती कुलस्वामिनी प्रतिष्ठानचे विलास कोरडे यांनी दिली आहे.