असेही शिक्षक...मोखाड्यातील अतिदुर्गम भागात स्पीकरच्या माध्यमातून भरते बोलकी शाळा - दिगंत स्वराज फाऊंडेशन
लॉकडाऊननंतर ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. सध्या त्यावर अंमल सुरू असून सर्वत्र ऑनलाइन शिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र या ऑनलाइन शिक्षणाचा फटका अतिदुर्गम, ग्रामीण, भागातील विद्यार्थ्यांना बसल्याचे पाहायला मिळले. तरीही या अडथळ्यांवर मात करत पालघरमध्ये एक अनोखी शक्कल लढवण्यात आली आहे. एका सेवाभावी संस्थेने जिल्ह्यातील मोखाडा, जव्हार,इ. यांसारख्या अतिदुर्गम भागात ऑनलाइन शिक्षणाला पर्याय शोधलाय. या ठिकाणी स्पीकरच्या माध्यमातून मुलांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत.