धुळ्याच्या डोलचीला राज्यभरातून मागणी
धुळे - संपूर्ण राज्यात आणि देशात होळीचा सण मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. खान्देशात हा सण विशेष पद्धतीने साजरा केला जातो. धुळे शहरातील होळी राज्यात प्रसिद्ध आहे. धुलिवंदनाचा सण हा होळीपासून सुरू होतो. धुलिवंदनाच्या दिवशी ठिकठिकाणी कारंज्या लावून डिजेच्या तालावर ठेका धरत एकमेकांना रंग लावत हा सण साजरा केला जातो. मात्र, यासोबत अतिशय आकर्षणाचा विषय असतो तो म्हणजे डोलचीने धूलिवंदन साजरी करणे. डोलची ही लोखंडी पत्र्यापासून तयार केली जाते.