महाराष्ट्र

maharashtra

तुम्ही तुमची स्टोरी सांगा; तुम्हाला दहा रुपये देतो - तणावमुक्तीसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग

By

Published : Dec 23, 2020, 4:11 PM IST

पुणे - हे शहर शिक्षणाचे माहेर घर म्हटले जाते तर पिंपरी-चिंचवड उद्योग नगरी म्हणून संबोधल जाते. या दोन्ही शहरांमध्ये अवघ्या देशभरातून नागरिक स्थायिक झाले आहेत. काही जण शिक्षण आणि उद्योग व्यवसायासाठी आलेले आहेत. मात्र, यावर्षी कोरोना महामारीमुळे सगळ्यांचे अतोनात नुकसान झाले. अनेक जण तणावाखाली आहेत, त्यांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. हाच तणाव घालवण्याचे काम एक कॉम्प्युटर इंजिनिअर तरुण करत आहेत. तो हातात एक फलक घेऊन माझ्याकडे या आणि तुमच्या मनातील गोष्टी सांगा अस म्हणत आहे. राज डगवार असे या तरुणाचे नाव आहे. समोरील व्यक्तीच बोलण ऐकून घेतल्यानंतर राज त्यांना दहा रुपये देतो. या तरुणाचे या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details