Crime : पोलीस असल्याची थाप मारून लुटणारी टोळी गजाआड, लाखोंचा मुद्देमाल जप्त - dhule police crime branch
धुळे - पोलीस (dhule police) असल्याची थाप मारून लुटणाऱ्या इराणी टोळीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (crime branch) पथकाने गजाआड केले आहे. टोळीतील पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक चारचाकी, दोन दुचाकी व इतर साहित्य असा 7 लाख 26 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. दिवाळीमध्ये धुळे जिल्ह्यातील निजामपूर व दोंडाईचा या ठिकाणी पोलीस असल्याची बतावणी करुन वृद्धांकडून सोन्या-चांदीचे दागिने लुटण्याच्या घटना घडल्या होत्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास करण्या येत होता. त्यावेळी ही टोळी चाळीसगाव रोड परिसरात फिरत असल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी चाळीसगाव रस्त्यावरील चोफुली या परिसरात सापळा रचून टोळीच्या मुसक्या आवळल्या आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.