पुणे : गणेश मंडळांसमोर ढोल-ताशे वादनाची परवानगी देण्याची ढोल-ताशे पथकांची मागणी - पुणे ढोल ताशे पथक मागणी बातमी
पुणे - पुण्यातील गणेशोत्सवावर मागच्या वर्षीप्रमाणे या वर्षीही निर्बंध लादण्यात आले आहेत. कोरोनमुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आदेश पोलिसांनी आहेत. मात्र, या नियमावर ढोल पथक वादक नाराज आहेत. त्यामुळे ढोल पथक वादकांना गणेश मंडळासमोर वादन करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी पुणे पोलीस आयुक्तांकडे या वादकांनी केली आहे.