चंद्रपूर: महाकाली मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क लावणे सक्तीचे - Chandrapur marathi news
चंद्रपूर - जिल्ह्याचे आराध्यदैवत समजल्या जाणाऱ्या महाकाली मंदिरात येणाऱ्या भाविकांना मास्क लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. ज्यांनी मास्क लावले नाहीत. त्या भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. तसेच निर्जंतुकीकरनासाठी सॅनिटायझर मशीन देखील लावण्यात आली आहे. या सर्व नियमांचे पालन भाविक करीत आहेत की नाही, यासाठी पहारेकरी तैनात करण्यात आले आहेत.