VIDEO : देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 20 फूट रुंद आणि 30 फूट लांब तिरंग्याचे ध्वजारोहण - नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट नागपूर ध्वजारोहण
नागपूर - प्रजासत्ताक दिनानिमित्त विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (बुधवारी) नागपूर येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये ध्वजारोहण करण्यात आले. 105 फूट उंच खांबावर 20 फूट रुंद आणि 30 फूट लांबीचा विशाल असा तिरंगा फडकविण्यात आला. नागपुरातील सर्वात हा मोठा राष्ट्रध्वज आहे. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट ही संस्था राष्ट्रीय सेवा करण्यासाठी तयार झालेली संस्था आहे. रुग्ण सेवा आणि राष्ट्र सेवेला समर्पित संस्था आहे. राष्ट्र सेवेच्या कार्याचा कधीही विसर पडू नये, या करिताच तिरंगा झेंडा नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट लावण्यात आला, असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.