पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नानंतर अनेक देश धावले भारताच्या मदतीला - यवतमाळ लसीकरण बातमी
यवतमाळ - लसीकरण करताना लसींचा पुरवठा किती होतो, याचा विचार करून नियोजन करावे लागते. एका दिवसात सर्व लसी तयार होत नाहीत, अशी प्रतिक्रीया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यवतमाळमध्ये कोरोनास्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी सांगितले की, सीरम कंपनीलाही लसीसाठीचा कच्चा माल मिळण्यास अडचणी आल्या. मात्र पंतप्रधान मोदी यांनी प्रयत्न केल्यानंतर ही अडचण दूर झाली. अनेक देश आता भारताला मदती करण्यासाठी तयार आहेत, असेही त्यांनी सांगितले.