मदिरालये सुरू मात्र, मंदिरे अद्याप बंद; देवयानी फरांदे यांची राज्य सरकारवर टीका - देवयानी फरांदे लेटेस्ट न्यूज
नाशिक - राज्यात मंदिरे बंद असल्यामुळे भाजपाकडून रोज महाविकासआघाडीवर टीका होत आहे. भाजपा आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी राज्यात मदिरालये सुरू आहेत मात्र, मंदिरे बंद आहेत. ही महाराष्ट्रासाठी दुर्दैवी बाब असल्याचे म्हटले आहे. त्यांनी आज नाशिकचे ग्राम दैवत असलेल्या कालिका मातेची पूजाकरून दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला.