विधानपरिषदेच्या उपाध्यक्ष नीलम गोऱ्हे यांनी दगडूशेठ दत्त मंदिरात केली महाआरती - गुरुदत्त
पुणे - मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारच्या पवित्र दिनानिमित्त विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुण्याचे श्रद्धास्थान असणार्या दगडूशेठ दत्त मंदिरात श्री गुरुदत्त दर्शन व महाआरती केली. तसेच दत्त जयंतीच्या अभिषेकाची पूर्तता केली. यावेळी महाराष्ट्रात शांतता सुख समृद्धी रहावी, कोरोनाचा धोका असाच कमी होत जावो, अशी प्रार्थना केली असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या.