बीडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी अडवली उपमुख्यमंत्र्यांची गाडी - बीड कंत्राटी कर्मचारी
बीड - जिल्हा रुग्णालयात कंत्राटी म्हणून कोविडच्या काळात घेतलेल्या नर्स, वॉर्डबॉय यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गाडीला अडवत आपल्या मागण्या मान्य करा, अशी मागणी केली. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने कंत्राटी पदभरती केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताच कामावरून कमी केले आहे. याविरोधात बीडमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा ताफा अडवून गोंधळ घातला. यादरम्यान कंत्राटी कामगारांची नेमकी काय? भूमिका आहे हे जाणून घेतलयं 'ईटीव्ही भारत'ने.