दिंडोरीत दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम - नाशिक जिल्हा बातमी
नाशिक - जिह्यात थंडीची लाट कायम आहे. दिंडोरी तालुक्यात आज सकाळी दाट धुक्यामुळे वाहनचालकांना वाहन चालवणे अवघड झाले होते. दिंडोरी तालुका हा गुजरात राज्याला जोडणारा तालुका आहे. या तालुक्यातून नाशिक, सापुतारा, वासदा, सुरत, अहमदाबादला जोडणारा रस्ता आहे. मात्र, आज सकाळी दाट धुक्याचा वाहतुकीवर परिणाम झाला. वाहनचालक तासी 20 किलोमीटरच्या वेगाने वाहन चालवत असल्याचे दिसून आले.