नारायण राणेंविरोधात महाड येथे शिवसैनिकांची निदर्शने; प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन - Narayan Rane news Mahad
रायगड - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी 23 ऑगस्ट रोजी महाड येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याचे पडसाद राज्यात उमटले आहेत. महाड शहर पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसैनिक आक्रमक झाले असून महाड शहरात नारायण राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपलांचा हार घालून गाढवावरून धिंड काढण्यात आली. राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन शिवसैनिकानी केले. शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्ग अडवून धरला आहे. यावेळी शिवसैनिकांनी राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यानिमित्ताने पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.