पुण्यातील 'या' हॉटेलमध्ये 'मूकबधिर' कर्मचारी देताहेत ग्राहक सेवा - पुणे मुकबधिरांचे हॉटेल बातमी
पुणे - शहरात खवय्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरात मोठ्या संख्येने हॉटेल रेस्टॉरंट आहेत. या हॉटेल आणि रेस्टॉरंटवरून नवनवीन पदार्थ ग्राहकांना सर्व्ह केले जातात. त्यामुळे खाद्य संस्कृती जपत नवनवीन प्रयोग करणारे शहर म्हणूनही अलीकडे पुण्याची ओळख निर्माण झाली आहे. याच पुण्यात आता एक नवीन हॉटेल सुरू झाले आहे. या हॉटेलचे वैशिष्ट्य म्हणजे येथे काम करणारे सर्व कर्मचारी हे 'मूकबधिर' आहेत. हेच कर्मचारी या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांना सेवा देत आहेत.