दहिसर परीसरात वकिलावर तलवारीने हल्ला, भररस्त्यावर गुंडांचा हैदोस - attack on a lawyer
मुंबई - येथील दहिसर परिसरात दिवसा ढवळ्या वकिलावर तलवारी घेऊन हल्ला केला आहे. एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून आणखी आरोपींचा शोध सुरू आहे. एमएचबी पोलीस ठाण्यात याप्रकरणी हत्येचा प्रयत्न, महाराष्ट्र हत्यारबंदी कायदा तसेच आपत्ती व्यवसथापन कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Last Updated : Jul 19, 2021, 12:38 PM IST