नवी मुंबईतील नव्या प्रकल्पाला दि.बा.पाटीलांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सुचवावे - एकनाथ शिंदे - एकनाथ शिंदे ताज्या बातम्या
मुंबई - नवी मुंबई विमानतळाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव सिडकोने मंजूर केला आहे. त्यामुळे नवी मुंबई येथील नव्या मोठया प्रकल्पाला दि.बा. पाटील यांचे नाव प्रकल्पग्रस्त कृती समितीने सुचवावे, अशी मागणी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तसेच या आधी नवी मुंबई विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा प्रस्ताव आला नव्हता, असेही ते म्हणाले. दरम्यान, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीतील पंतप्रधानांच्या भेटीची माहिती दिली, असल्याचेही त्यांनी सांगितले.