महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

सांगलीत निकृष्ट रस्ते, ठेकेदार-पालिकेच्या विरोधात दलित महासंघाचे "गाढव"आंदोलन - सांगली निकृष्ट रस्ता न्यूज

By

Published : Jun 19, 2021, 5:35 PM IST

सांगली - सांगली महापालिका क्षेत्रात प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आलेला ट्रायमिक्स रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप दलित महासंघाने केला आहे. या विरोधात दलित महासंघाने 'गाढव' आंदोलन केले. महापालिकेचे आयुक्त व ठेकेदार यांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. रस्त्याचे काम निकृष्ट केल्याचा आरोप सांगली महापालिकेने महापालिका क्षेत्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर ट्रायमिक्स रस्ता केला आहे. शहरातल्या राम मंदिर ते सिव्हिल हॉस्पिटल चौकापर्यंत हा रस्ता आहे. आता हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याच्या कामात गौडबंगाल आणि रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप दलित महासंघाने केला आहे. रस्त्याची वाढवण्यात आलेली उंची, रस्त्याला अनेक ठिकाणी पडलेल्या भेगा, अशा अनेक गोष्टींमुळे या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे दलित महासंघाच्या वतीने सांगली महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी आयुक्त आणि ठेकेदाराचा निषेध करण्यात आला. या आंदोलनात पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या ट्रायमिक्स रस्त्यावर 'गाढव' घेऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details