'दगडूशेठ हलवाई' जम्मू काश्मीरमध्ये विराजमान..! - दगडूशेठ हलवाई गणपती बातमी
पुणे - शहरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रसिद्धी देशभरात आहे. आता याच दगडूशेठ गणेशाच्या प्रतिकात्मक मूर्तीचे जम्मू काश्मीरमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दर्शनासाठी सातत्याने पुण्यात येणाऱ्या भारतीय लष्करातील ६ मराठा बटालियनच्या सैनिकांनी मूर्तीची स्थापन केली आहे. जम्मू काश्मीरमधील गुरेज सेक्टर कंजलवान या गावी गणपतीसाठी सुंदर मंदिर बांधण्यात आले असून त्या मंदिरात दगडूशेठ गणपतीची प्रतिकृती असणाऱ्या मूर्तीची नुकतीच प्रतिष्ठापना करण्यात आली. यासाठी दगडुशेठ हलवाई मंदिर समितीनेही पुढाकार घेतला आहे.