कंगणा रणौतने बोलताना भान ठेवावं - दादाजी भूसे - कंगणा रणौत
अभिनेत्री कंगणा रणौत महान व्यक्तिमत्व असून माझ्यासारख्या पामराने त्यांच्याबद्दल काय बोलावे ? पण ऐवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर कोणाबद्दल काय बोलावे याचे भान त्यांनी बाळगावे, असा सल्ला कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी कंगणाला दिला आहे. जगाला माहिती हे की लाखो शहिदांच्या बलिदानाने देशाला स्वातंत्र्य मिळाले. अनेकांनी घरादारावर तुळशीपत्र ठेवले. कोणी अंहिसेच्या तर काहिनी सशस्त्र क्रांतीने उठाव करत भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्याचा अपमान करता कंगणा राणावतने बोलताना भान राखावे अशी टिका त्यांनी केली आहे. एवढा मोठा पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांनी त्या पुरस्काराचे भान ठेवले पाहिजे असे कृषीमंत्री दादाजी भुसे यानी यावेळी सांगितले आहे.