राज्यात आजपासून संचारबंदी, जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद - कोरोना विषाणू
मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता आता राज्यात संचारबंदी लागू करून राज्यातील जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. यात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाणाऱ्या वाहतुकीवरही बंदी घालण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरेंनी फेसबुक लाईव्हवरून याबाबत माहिती दिली.