महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

VIDEO : अमरावतीत संचारबंदीचा शेतकऱ्यांना फटका; चार दिवसांपासून बाजारपेठ बंद - APMC Amravati

By

Published : Nov 17, 2021, 10:04 AM IST

अमरावती - अमरावतीत शनिवारी उफाळलेल्या हिंसाचारानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाला होता. त्यामुळे अमरावती शहरांमध्ये चार दिवसांची संचारबंदी लावण्यात आली. परंतु आता ही संचारबंदी आणखी वाढविण्यात आली आहे. या संचारबंदी मध्ये अमरावती शहर पूर्ण बंद आहे. त्यामुळे अमरावतीतील कृषी उत्पन्न बाजार समिती देखील देखील बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला व फळे कुठे विकावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. अमरावती कृषी उत्पन्न बाजारपेठ बंद असल्याने शेतात भाजीपाला आता सडू लागला आहे. आधी कोरोनाचा फटका शेतकऱ्यांना बसला त्यानंतर आता अमरावतीत सुरू असलेल्या संचारबंदीचा फटका ही शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळे संचारबंदीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीला सूट द्यावी अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी...

ABOUT THE AUTHOR

...view details