Amravati Violence : शहरात संचारबंदी, रस्त्यांवर शुकशुकाट; परिस्थिती नियंत्रणात - Amravati Curfew
अमरावती - शहरात बंदला हिंसक वळण लागले. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करत पाण्याचा मारा केला. तसेच अश्रुधुरांचा मारा देखील करण्यात आला. त्यामुळे जमाव नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी अमरावती शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अमरावती शहर निर्मनुष्य झाले असून रस्त्यावर शुकशुकाट पहायला मिळाला. रस्त्यावर केवळ पोलीस दिसून येत आहे. यासंदर्भात इतवारा चौकातुन परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप यांनी...