'बर्ड फ्लू'मुळे मुरुंबा गावात संचारबंदी, पोलीस बंदोबस्त तैनात
परभणी - तालुक्यातील मुरुंबा गावात चार दिवसांपूर्वी बर्ड फ्लूमुळे सुमारे 800 कोंबड्यांच्या मृत्यू झाला. त्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांत पुन्हा याच परिसरातील अन्य पोल्ट्री फार्मवरील कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. परिणामी हा संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने या गावात कर्फ्यू लावला आहे. परिसरातील एक किलोमीटरच्या पोल्ट्री फार्मवरील सर्व कोंबड्या नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातही 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने गावात जाऊन घेतलेला हा आढावा...