ठाणे : टीएमटीने प्रवास करण्यासाठी नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा - ठाण्यात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा
ठाणे - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'ब्रेक द चेन' अंतर्गत कडक निर्बंध लावण्यात आले आहे. तरी सुद्धा ठाण्यातील सॅटिस ब्रिज येथे आज सकाळी प्रवाशांची टीएमटीने प्रवास करण्यासाठी नागरिकांची गर्दी दिसून आली. यावेळी कोणतेही सोशल डिस्टंन्सिंग नव्हते. तसेच केवळ अत्यावश्य सेवेतील नागरिकांनाच प्रवासाची परवानगी असताना कोणाचेही ओळखपत्र तपासल्या जात नसल्याचे पुढे आले आहे. यासंदर्भात 'ईटीव्ही भारत'ने आढवा घेतला.