वाळवा रुग्णालयात लस घेण्यासाठी तोबा गर्दी; सोशल डिस्टन्सचा फज्जा - vaccination
सांगली - जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील रुग्णालयात लस घेण्यासाठी नागरिकांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी कोरोना नियमांचे उल्लंघन करत सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचे चित्र बघायला मिळाले. वाळवा तालुक्यातील रुग्णालयात लस घेण्यासाठी झालेल्या गर्दीवर आता चिंता व्यक्त होताना दिसत आहे. शनिवारी तालुक्यात 288 जण कोरोना पॉझिटिव्ह आले होते. यापैकी 190 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात लसीकरणाच्या वेळी मोठ्या संख्येनी होणारी गर्दी ही कोरोना प्रसारास कारणीभूत ठरण्याची भितीही व्यक्त केली जात आहे.