मुंबई : दादरच्या भाजीमार्केटमध्ये नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा - मुंबई दादर भाजी मार्केट
मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्य सेवेतील नागरिकांना यातून सूट देण्यात आली आहे. मात्र, दादरच्या भाजी मंडई परिसरात नियमांची पायमल्ली होताना दिसून येते. सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला आहे. पहाटेपासून येथे भाजी खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे या गर्दीतून कोरोना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. या परिसरातून 'ईटीव्ही भारत'ने आढावा घेतला.