जलाशयाचे पाणी शेतात शिरल्याने ८० एकरातील धानाची नासाडी - पीक नुकसान बातमी गोंदिया
संपूर्ण राज्याला परतीच्या व अवकाळी पावसाने अक्षरश: झोडपून काढले. यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातही या पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसला तर त्याचे पंचनामेही अद्याप सुरूच आहेत. या भयावह परिस्थितीतून शेतकरी सावरत नाही तर दुसरीकडे तिरोडा तालुक्यातील एकोडी येथील शेतकऱ्यांच्या आता अस्मानी संकटापाठोपाठ सुल्तानी संकटाचा सामना करावा लागत आहे.