VIDEO : पगारवाढ नको विलीनीकरण करा; आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांची भूमिका - st workers strike update
मुंबई - एसटी महामंडळाचे विलीनीकरण करावे या मागणीसाठी २७ ऑक्टोबरपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. (ST Workers Strike) याचाच एक भाग म्हणून कर्मचारी गेले दोन आठवडे आझाद मैदानात आंदोलन (ST Workers at Azad Ground) करत आहेत. याप्रकरणी न्यायालयाने समिती नियुक्त केली आहे. तर आज परिवहन मंत्री अनिल परब व आंदोलनकर्त्यांमध्ये भेट झाली. यावेळी पगार वाढीबाबत चर्चा झाली. मात्र, पगारवाढ नको, विलीनीकरण करा अशी भूमिका आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे. तसेच जोपर्यंत विलीनीकरण होत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, अशी भूमिका एसटी कर्मचाऱ्यांनी घेतली.
Last Updated : Nov 24, 2021, 7:09 PM IST