#JantaCurfew पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात शुकशुकाट
पुणे - कोरोना विषाणूचा भारतातील प्रसार रोखण्यासाठी आज 'जनता कर्फ्यू' पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या घरात थांबण्याच्या आवाहनाला नागरिकांचा राज्यात सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पुणे शहरातही लोकांनी उत्स्फुर्तपणे घरी राहणे पसंत केले आहे. नेहमी गजबजलेल्या पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात सर्वत्र शुकशुकाट असल्याचे पाहायला मिळाले.