कापसाच्या बाजाराला 'कोरोना'चा संसर्ग..! शेतकऱ्यांवर नवे संकट
चीनमध्ये हाहाकार उडवणाऱ्या कोरोना व्हायरसने साऱ्या जगाची झोप उडवली आहे. या व्हायरसने आता चीनच्या सिमा ओलंडल्या आहेत. त्याचा परिणाम जागतिक बाजारवर झाला आहे. चीनची बाजारपेठ या व्हायरसने ठप्प झाली आहे. भारतातील सर्वाधिक कापूस चीनमध्ये निर्यात होतो. भारतातून चीनमध्ये 45 लाख कापसाच्या गाठी दरवर्षी निर्यात होतात. मात्र, या व्हायरच्या बाजारावरील परिणामामुळे या वर्षी केवळ 4 लाख गाठीच निर्यात होऊ शकल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कापसाचे भाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढावले आहे.