तरुणांचे लसीकरण बंद करु नका; अमरावतीच्या तरुणांची सरकारकडे मागणी - अमरावती कोरोना लेटेस्ट
अमरावती - राज्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले होते. पण आता शासनाने या वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला स्थगिती दिल्यामुळे १८ ते ४५ वयोगटातील लोकांचे लसीकरण होणार नाही. त्यामुळे आज लसीकरण केंद्रावर आलेल्या लोकांना परत जावे लागल्याचे चित्र पहायला मिळाले. दरम्यान या वयोगटातील लसीकरण स्थगितीचा निर्णय सरकारने मागे घ्यावा आणि तरुणांचे लसीकरण करावे, अशी मागणी अमरावती जिल्ह्यातील तरुणांने सरकारकडे केली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, नागरिक लसीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहे. त्यातच १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची घोषणा सरकारने केल्या नंतर नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी केली. मागील काही दिवसांपासून या वयोगटातील लसीकरण सुरू असतानांच, आता त्या लसीकरणाला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्थगिती दिल्याने तरुणांनी नाराजी व्यक्त केली आहे.