video एका खाटावर दोन रुग्ण, नागपूर मेडिकल रुग्णालयातील स्थिती पहा..! - नागपुरातील कोरोना स्थिती
नागपूर - वाढत्या कोरोना रुग्णांमुळे सरकारी मेडिकल रुग्णालयामध्ये गर्दी वाढली आहे. एका खाटेवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे चित्र आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठी असल्याने आणि एकाच वेळी अचानक रुग्ण आल्यानंतर त्यांना तत्काळ ऑक्सिजन मिळणे, उपचार देणे गरजेचे असल्याने एका खाटावर कधी-कधी दोन रुग्णांना घेतले जाते. खाट रिकामे होतील तसे त्यांना दुसऱ्या जागेवर हलवले जाते, असे अधिष्ठाता अविनाश गावंडे यांनी सांगितले.