प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना; राधाकृष्ण विखे पाटील सपत्निक उपस्थित - pravara business group ganeshotsav
अहमदनगर - प्रवरा उद्योग समूहाच्या गणेशाची स्थापना भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि त्यांच्या पत्नी शालिनी विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखाना कार्यस्थळावर पंरपरेनुसार गणरायाचे आगमन झाले. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सरकारवर टीका केली. मंदिरे बंद ठेवून कोरोनाचे संकट टाळता येऊ शकेल, हा महाविकास आघाडी सरकारचा भ्रम असल्याचे ते म्हणाले. तसेच कोणत्याही उत्सवावर बंधन घालण्यापेक्षा नियम करून उत्सव साजरे करू दिले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, कोरोनाच्या संकटामुळे कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय उत्सव समितीने घेतला आहे.