स्पेशल रिपोर्ट : दादर भाजी मार्केटमध्ये कोरोना नियमांना हरताळ - dadar
मुंबई - कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे महाराष्ट्र सध्या वाईट परिस्थितीतून जात आहे. राज्यात कोरोना केसेस सतत वाढत आहेत. कोरोना संक्रमण सुरु झाले त्यानंतरची सर्वाधिक रुग्णसंख्या काल महाराष्ट्रात नोंदवली गेली. कोरोनाला रोखण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दिवसा जमावबंदी, रात्रीची संचारबंदी, विकेंड कर्फ्यू असे उपाय योजले जात आहेत. मात्र मुंबईतील प्रमुख भाजी मार्केटमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. दादरला स्टेशनच्या बाहेर असलेल्या भाजी मंडईमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला दिसत आहे. नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे राज्य सरकारकडून सतत आवाहन केले जात आहे. जनता प्रशासनाच्या आवाहनाला कसा प्रतिसाद देत आहे, याचा आढावा ईटीव्ही भारत प्रतिनिधी केदार शिंत्रे यांनी घेतला आहे.