पुणे शहरात विकेंड लॉकडाऊन; जनजीवन ठप्प - pune lockdown latest news
पुणे - राज्यभरात कोरोना संसर्ग वाढत असल्याने शनिवार आणि रविवार दोन दिवस विकेंड लॉकडाऊन करण्यात आला आहे. पुणे शहरात देखील कोरोनाचा कहर सुरू आहे. राज्यात दररोज पाच हजार पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात देखील कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे तसेच शनिवार रविवार. या लॉकडाऊनमध्ये नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे , शहरातल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्था या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू आहे. केवळ मेडिकल आणि दुग्धजन्य पदार्थांची दुकाने सुरू आहेत. तसेच हॉटेलमधील पार्सल व्यवस्था सुरू आहे. पुण्यातील या लॉकडाऊनचा आढावा घेतला आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी राहुल वाघ यांनी.