क्रिकेटनंतर आता कोरोना सट्टा बाजाराच्या पथ्थ्यावर; रुग्णांच्या आकडेवारीवर लागतोय लाखोंचा सट्टा! - कोरोनोवर सट्टा
एप्रिल ते जून हे तीन महिने सट्टा बाजारातील सर्व बुकी आयपीएल स्पर्धेवर लागणाऱ्या सट्टा प्रक्रियेत गुंतलेले असतात. मात्र, आयपीएल स्पर्धा रद्द झाल्याने सट्टा बाजारातील बुकींनी कोरोना रुग्णांच्या वाढत जाणाऱ्या संख्येवर सट्टा घेणे सुरू केले आहे. यासाठी आरोग्य सेतू अॅपचा देखील वापर करण्यात येतोय.