'मराठा आरक्षणासाठी कायदेशीर लढाई सुरूच राहील' - नाना पटोले मराठा आरक्षण न्यूज
'मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल निराशाजनक आहे. मात्र, या निकालानंतरही कायदेशीर लढाई सुरूच राहील. मराठा आरक्षण कायदेशीर निकषावर यापुढे कसे लढता येईल? याची पडताळणी ठाकरे सरकार करत आहे. मराठा समाजातील तरुणांनी निराश होऊ नये', असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केले आहे.